|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » लिंगायत विभक्त धर्मःप्रस्ताव केंद्रातर्फे फेटाळला

लिंगायत विभक्त धर्मःप्रस्ताव केंद्रातर्फे फेटाळला 

 ऑनलाईन टीम / बेंगळूर

लिंगात विभक्त धर्मा संदर्भातील प्रस्तावाचा निर्णय राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला होता. मात्र केंद्राने तो निर्णय फेटाळला असल्याची माहिती केंद्राचे वरिष्ट सॅलिसीटर जनरल प्रभुलिंग नावटगी यांनी हायकोर्टला माहिती दिली आहे. राज्याच्या प्रस्तवाला केंद्राने दि. 13 नोव्हेंबरला ‘नो’ म्हंटले आहे. या संदर्भात राज्य शासनाला देखिल माहिती पाठाविली होती. राष्ट्रीय अल्पसंख्याक विभाग आणि गृह विभागाने हा प्रस्ताव फेटाळला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

त्याचबरोबर केंद्र सरकारने राज्य शासनाकडे त्यासंबंधी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती देखिल त्यांनी यावेळी दिली. लिंगात विभक्त धर्मासंदर्भात राज्य भरात विविध मोर्चे निघाले होते.