|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » उद्योग » तामिळनाडूला एडीबीकडून 3 कोटी डॉलर्स

तामिळनाडूला एडीबीकडून 3 कोटी डॉलर्स 

अशियाई विकास बँकेचा प्रस्ताव : पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न

नवी दिल्ली

 भारतातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी अनेक योजना आणि मदत पुरवठा करण्यात येत असतो. त्यात प्रामुख्याने केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्या मार्गदर्शनाखालीच ही योजना किंवा कर्जाचा पुरवठा करण्यात येतो. परंतु आता अशियाई विकास बँकच (एडीबी) पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या तामिळनाडू राज्याला पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी जवळपास 3.1 कोटी डॉलर्सची रक्कम देणार असल्याची माहिती अर्थमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

आशियाई विकास बँकेच्या नियमावलीनुसार एकूण आठ क्षेत्रांमध्ये पर्यटन विकास करण्यात यावा असे म्हटले आहे. यात संग्रालय, मंदीरे, आणि तलाव आणि यांच ठिकाणी योग्य पाणी व लाईटसह इतर सुविधां देण्यासाठीचा प्रस्ताव सदरच्या नियमावलीत करण्यात आलेला आहे.

2020 पर्यत कालावधी

पुर्ण योजना राबविण्यासाठी एकूण 4.40 कोटी डॉलर्स रक्कम देण्यात येणार असून यात सरकारकडून 1.30 कोटी डॉलर्सची रक्कम उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ही योजना पुर्णत्वास येण्यासाठी जून 2020पर्यतचा कालावधीत लागणार असल्याचा अंदाज मांडण्यात आलेला आहे.

 

Related posts: