|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » Top News » खेलो इंडीया स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे-नीलम कपूर

खेलो इंडीया स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे-नीलम कपूर 

ऑनलाईन टीम / पुणे :

 खेलो इंडीया स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाच्या (साई) महासंचालक नीलम कपूर यांन आज केले. महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या सभागृहात खेलो इंडीया स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाच्या महासंचालक नीलम कपूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अतरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाचे उपमहासंचालक संदीप प्रधान, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, “पीएमआरडीए”चे आयुक्त किरण गित्ते, संयोजन समितीचे अध्यक्ष तथा उपसचिव (क्रीडा) राजेंद्र पवार, स्पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडीयाचे सचिव श्री छाबरा, संयोजन समितीचे सचिव तथा सहसंचालक (क्रीडा) एन. एम. सोपल उपस्थित होते.
       नीलम कपूर म्हणाल्या, देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील शालेय वयोगटांच्या खेळाडूंना चालना मिळावी यासाठी खेलो इंडीया या स्पर्धेचे देशपातळीवर आयोजन करण्यात येते. यावर्षी या स्पर्धेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. ही स्पर्धा यशस्वी करून इतर राज्यांसमोर महाराष्ट्राने आदर्श निर्माण करावा. या स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू हे शालेय वयोगटातील असल्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची वाढीव जबाबदारी आपल्यावर आहे. हे सर्व खेळाडू अल्पवयीन असल्याने संयोजन समितीने अधिक काळजीपूर्वक नियोजन करण्याची आवश्यकता आहे.
     या स्पर्धेच्या आयोजनात आरोग्य विभागाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असून क्रीडा प्रकारांच्या अनुषंगाने आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. ही स्पर्धा पाहण्यासाठी सर्वांसाठी खुली व मोफत आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी अधिकाधिक शालेय विद्यार्थी आणि पालक यावेत यासाठी विशेष प्रयत्न करावेत. स्पर्धा कालावधीत नियुक्त करण्यात येणारे स्वयंसेवक निवडताना चांगल्या प्रकारे निवडा व त्यांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी संजय सबनीस यांनी स्पर्धेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाचे सादरीकरण केले. या बैठकीला केंद्र व राज्य शासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related posts: