|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » आगामी काळात चीनच्या ई-व्यापारांवर मर्यादा

आगामी काळात चीनच्या ई-व्यापारांवर मर्यादा 

चीनच्या ऑनलाईन शॉपिंगवर निर्बंध : नवीन नियमावली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतात आगामी काळात चीनच्या उत्पादनावर मर्यादा लावण्यात येणार असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ही मर्यादा प्रामुख्याने ई-कॉमर्सच्या माध्यमातून करण्यात येणाऱयां व्यापारावर केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यासाठी भारत सरकार एक नवी योजना लवकरच करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

चीनकडून करण्यात येणाऱया उत्पादनांचा भारतीय उत्पादनांवर नकारात्मक परिणाम होत आहेत. म्हणून सरकार ऑनलाईन व्यापार करणाऱया वेबसाईट्स आणि कार्यरत असणारे ऍप यांचा वापर करण्यासाठी मर्यादा लावण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

देशांतर्गत अशी उत्पादने विकत असाताना चिनी कंपन्या भारतीय कायद्यांचे उल्लघन करत असल्याची माहिती इंडस्ट्रीअल पॉलिसी विभागाकडून देण्यात आली आहे. कारण चीन आपली उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवत असताना अनेक प्रकाराची उत्पदनांवर ऑफर व नव नवीन योजना लागू करत असल्यामुळे सरकार ऑनलाईन बाजारासाठी नवीन व्यापार संदर्भातील कायदेविषयक बदल येणाऱया कालावधीत तयार करणार असल्याचा प्रस्ताव सरकारी पातळीवर देण्यात आलेला आहे.

व्यापारात बदल..

 सध्या ऑनलाईन वापर वाढत असल्यामुळे येणाऱया दिवसांमध्ये व्यापारांची संकल्पना बदल घेणार असुन त्याला नवीन भरारी किंवा नवी संजीवनी देण्यासाठी ग्राहकांवर परिणाम करणाऱया विदेशी कंपन्यांवर निर्बंध ठेवण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलेले आहे.