|Saturday, May 25, 2019
You are here: Home » उद्योग » मिंत्राचे सीईओं अनंत नारायण यांचा राजीनामा

मिंत्राचे सीईओं अनंत नारायण यांचा राजीनामा 

वृत्तसंस्था/ मुंबई

ऑनलाईन फॅशन रिटेल कंपनी मिंत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनंत नारायण यांनी आपल्या  पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून अनेक कंपन्यांमध्ये राजीनामा देण्याचे सत्र सातत्याने सुरु आहे. आता या कंपनीचे नेतृत्व फ्लिपकार्टचे अमर नागाराम हे करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिंत्रा फ्लिपकार्टची ऑनलाईन कंपनी फॅशन रिटेलर युनिटचीच आहे. फ्लिपकार्टची 70 टक्के हिस्सेदारी अमेरिकन कंपनी वॉलमार्टने खरेदी केली आहे. व जुलै 2015 पासून नारायण हे पद सांभाळत आहेत.

आतापर्यंत 150 जणांना काढण्यात आले.

मिंत्रा कंपनी आणि फॅशन रिटेल याचे एकत्रितपणे 150 ते 200 जणांना पदावरुन कमी केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात मुख्य महसूल अधिकारी मिथून सुंदर, एचआर मनप्रीत राटिया यांनी दिलेला राजीनामा यामुळेच  राजीनाम्यावर चर्चा होत असल्याचे पहावयास मिळत आहे. यांनी मार्केटमध्ये सध्या वेगळीच चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे.

Related posts: