|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » स्कोडाची वाहने जानेवारीत 2 टक्क्यांनी महागणार

स्कोडाची वाहने जानेवारीत 2 टक्क्यांनी महागणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतामधील स्कोडा ऑटो कंपनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या वाहनांच्या किंमतीत वाढ करणार आहे. ही 2 टक्क्यांनी करयात येणार असून नवीन दर 1 जानेवारी 2019 पासून भारतीय बाजारात लागु होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

कंपनीला उत्पादीत करण्यासाठी करावा लागणारा खर्च आणि त्यासाठी बाहेरील देशातून घ्यावी लागणारी साधन सामुग्री याचा ही किंमत वाढीत विचार करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोठय़ा दरात चढ उतार  होत असलेल्यानेच त्याचाच परिणाम भारतातील वाहन विक्रीवर होण्यापेक्षा आम्ही  सदर वाहनांच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याचे भारतातील स्कोडाचे संचालक हॉलिस यांनी सांगितले आहे.

वाहनदरातील किंमती वाढवण्यासाठी प्रत्येक मॉडेल आणि त्याची बाजारात असणारी आवृत्ती यांचे मुल्यमापन करुनच हा निर्णय घेतला जाणार आहे. आणि त्या किंमती जानेवारीत लागु करण्यात येणार आहेत. तर इतर ऑटो क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी, टोयोटा यांनी वाहन विक्रीच्या दरात पुढील महिन्यापासून वाढ करण्यात येणार असल्याची माहिती अगोदरच सादर केलेली आहे.

नवीन वर्ष…

भारतात ऑटो क्षेत्रात मोठी उलाढाल येणाऱया वर्षांत होणार असल्याची माहिती अनेक ऑटो कंपन्यां आपल्या आकडेवारीच्या माध्यमातून सादर करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या वातावरणाचा ग्राहकांवर काय परिणाम राहणार आहे याकडे भारतीय बाजाराचे लक्ष राहणार असल्याची मते अनेक तज्ञ व्यक्त करत आहेत.