|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » टाटाची ‘हॅरीअर एसयूव्ही’ लवकरच बाजारात

टाटाची ‘हॅरीअर एसयूव्ही’ लवकरच बाजारात 

मुंबई

 भारतीय बाजारात सध्या एसयूव्ही गाडय़ांना चांगलीच पसंती मिळत आहे. त्यामुळे टाटाने दिल्ली ऑटो एक्सोमध्ये आपली एसयूव्ही श्रेणीतील नवी हॅरीअर कार सादर केली आहे. दिल्लीत सर्वांना हॅरीअरची झलक पाहायला मिळाल्यानंतर आता हॅरीअर बाजारात कधी दाखल होणार याची उत्सुकता लागली आहे.

हॅरीअरची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा आणि महिंद्रा एक्सयूव्ही 500 बरोबर होणार आहे. हॅरीअरचे एक्सटीरीअर अतिशय बोल्ड करण्यात आले आहे. या कारमध्ये आकर्षक व्हिल्स, एचडीआय प्रोजेक्टर हेडलॅम्पस, टेललाईट एचडी एलईडी लाईट यासह सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली गेली आहे. त्यामध्ये 6 एअरबॅग्स बरोबर एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, ऑफ रोड़ एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टैबिलीटी कंट्रोल यासारख्या आत्याधुनिक सुविधांवर जास्त भर देण्यात आला आहे.

सिटी, इको आणि स्पोर्टी मोड या कारमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. 1956 सीसी इंजिन क्षमता, 350 एनएम टॉर्क, 50 लिटर इंधन क्षमता, 6 स्पिड गिअर्स, फ्रन्ट व्हिल डिस्क ब्रेक यासह 9 जेबीएल स्पिकर्सची सोय उपलब्ध आहे.