|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजार रिकव्हर होत बंद

शेअर बाजार रिकव्हर होत बंद 

सेन्सेक्स 190 अंकानी वधार : निफ्टी 10,500 च्या वर

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय शेअर बाजारात मंगळवारी सुरुवातीच्या कालावधीत 500 अंकाची घसरण नोंदवण्यात आली होती. परंतु पाच राज्याच्या निवडणूकांच्या निकालांचे आकडे प्रसिद्ध होण्यास सुरुवात होताच या आकामध्ये काहीशी सुधारणा होण्याकडे वाटचाल झाली. आणि शेवटच्या क्षणात बाजारात समधानकारक रिकव्हर झाल्याचे पहावयास मिळाले. मंगळवारी सेन्सेक्सने 190 अंकानी मजबूत होत 35,150 वर बंद झाला. तर निफ्टी 10,550 च्या वरती जाण्यात यशस्वी झाला. तर मिडकॅप आणि बँकांचे शेअर्समध्ये जोरदार तेजी झाल्याचे दिसून आले.

भारतीय बाजारात येस बँक, सन फार्मा, एशियन पेन्टस, स्टेट बँक, आयटीसी, महिंद्रा, ऍण्ड महिंद्रा. कोटक बँक, कोल इंडिया, ओजस या कंपन्याचे शेअर्समध्ये 7 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. महत्वाच्या कंपन्यांमध्ये हीरोमोटो, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनि आणि एल ऍण्ड टी यांचे समभाग 1.58 टक्क्यांनी घसरण झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.

आयबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल व विरल आचार्य डेप्यीटी गव्हर्नर यांच्या एकाच दिवशी दिलेल्या राजीनाम्यामुळे शेअर बाजारातील अलाढालीवर मोठी उलाढाल झाली असल्याची दिसून आले. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 49 प  पैशानी कमजोर झाल्याचे ही नोंदवण्यात आले.

लोकसभेची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱया मंगळवारच्या पाच राज्याच्या निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. यात भारतीय जनता पार्टीला टक्कर देत काँग्रेस पक्षानी चांगलीच मुसंडी मारल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे भारतीय शेअर बाजार अंतिम क्षणी मोठी रिकव्हरी होत बाजार सावरण्यात मोठे यश मिळाल्याचे दिसून आले.