|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » उगाच हवेत उडणाऱयांना जनतेने जमिनीवर उतरवले : उद्धव ठाकरे

उगाच हवेत उडणाऱयांना जनतेने जमिनीवर उतरवले : उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी तीन राज्यांत काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याची संधी आहे. देशभरात मोदी लाटेच्या जोरावर तीन राज्यांत पुन्हा सत्ता स्थापन करण्याची भाजपाला आशा होती. परंतु जनतेने भाजपाची ही आशाच धुळीला मिळवली आहे. त्यानंतर आज शिवसेनेनेही भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

हिंदी पट्ट्यांतील तीनही राज्ये भाजपच्या हातून निसटली आहेत. तेलंगणात पुन्हा चंद्रशेखर राव विजयी झाले. तेथेही भाजप काँग्रेसच्या खाली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, मोदी व शहा यांनी ‘काँग्रेसमुक्त भारत’चे जे स्वप्न पाहिले होते त्याची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे, असे मत उद्धव ठाकरें यांनी व्यक्त केले आहे. किंबहुना या राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश आता दिला आहे. पर्यायाच्या शोधात न फसता जनतेने जे नको ते मुळापासून उखडून टाकले. जनतेने उगाच हवेत उडणाऱयांना जमिनीवर उतरवले. जनतेच्या धैर्यास साष्टांग दंडवत, असे म्हणत भाजपावर विखारी टीका करण्यात आली आहे.