|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » मध्य प्रदेशात फोडाफोडीचे राजकारण ; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा

मध्य प्रदेशात फोडाफोडीचे राजकारण ; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मध्य प्रदेशात काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपाला धक्का दिला असला तरी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळू शकलेले नाही. त्यामुळे आता अपक्ष, बसपा- सपा या पक्षाच्या आमदारांना महत्त्व प्राप्त झाले असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी सूचक विधन केले आहे. अपक्ष आणि अन्य पक्षाचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला असून लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करु, असे त्यांनी सांगितले.

 

मध्य प्रदेशमधील मतमोजणी बुधवारी सकाळी संपली असून 230 जागांपैकी काँग्रेसला 114 जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाला 109 जागांवर विजय मिळाला आहे. अपक्ष उमेदवार 4 जागांवर निवडून आले असून बहुजन समाज पक्षाला 2 आणि समाजवादी पक्षाला एका जागेवर विजय मिळाला आहे. या घडामोडी घडत असताना बुधवारी पहाटेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी एक ट्वटि केले.देशात काँग्रेसला जनादेश मिळालेला नाही. काही अपक्ष आणि अन्य पक्षाचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहे. लवकरच आम्ही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करु’, असे ट्वटि त्यांनी केले.