|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » माजी आमदार गोविंद केंद्रे यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार

माजी आमदार गोविंद केंद्रे यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

  महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘महाराष्ट्र समाजभूषण’ पुरस्कार उदगीर (जि. लातूर) येथील माजी आमदार गोविंद केंद्रे यांना जाहिर झाला. कोल्हापूर येथे संघटनेचे बुधवार (दि. 12) रोजी होणाऱया राज्य अधिवेशनामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. गोविंद केंद्रे सध्या भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी केलेल्या राजकीय, सामाजीक व राष्ट्रीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेवून हा पुरस्कार जाहिर केला. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, महिला राज्यप्रमुख संघटक लक्ष्मी पाटील, राज्य कार्याध्यक्ष बालाजी पांडागळे, जिल्हासंघटक पी. आर. पाटील, भगवान मुंडे, उषाताई नंदगावकर, जी. एस. मंगनाळे, शिवशंकर सोमवंशी यांनी केंद्रे यांची भेट घेवून पुरस्कार मिळाल्याचे पत्र दिले.