|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारत हिंदूराष्ट्र असायला हवे होते!

भारत हिंदूराष्ट्र असायला हवे होते! 

शिलाँग/ वृत्तसंस्था :

मेघालय उच्च न्यायालयाने स्वतःच्या एका निर्णयात हिंदुस्थानचा इतिहास तसेच फाळणी आणि त्यादरम्यान शिख, हिंदूंवर झालेल्या अत्याचारांचा दाखला देत महत्त्वाची टिप्पणी केली आहे.  पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक देश घोषित केले, तर भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली असल्याने त्याला देखील हिंदू राष्ट्र घोषित केले जायला हवे होते. परंतु तो धर्मनिरपेक्ष राहिल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोणीही भारताला दुसरा इस्लामिक देश करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा तो दिवस भारत आणि जगासाठी प्रलयकारी ठरेल असेही न्यायालयाने विधान केले आहे.

पंतप्रधान मोदींचे सरकार प्रकरणाचे गांभीर्य ओळखून योग्य पावले उचलेल असा आम्हाला विश्वास आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रहित विचारात घेऊन पूर्ण सहकार्य करतील. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून येणाऱया हिंदू, शिख, जैन, बौद्ध, पारसी, ख्रिश्चन, खासी, जयंतिया आणि गारो समुदायाला कोणत्याही चौकशी आणि दस्तऐवजाशिवाय भारताचे नागरिकत्व दिले जावे असे आवाहन न्यायालयाने केंद्र सरकारला केले आहे.

‘ते’ याचे देशाचे नागरिक

बांगलादेशातून आलेले बंगाली हिंदू आणि फाळणीवेळी शीख आणि हिंदूंसोबत झालेल्या अत्याचाराचा उल्लेख करत न्यायाधीश एस.आर. सेन यांनी अमोन राणा यांच्या स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राशी संबंधित याचिका निकालात काढत निर्णय दिला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमीत हे हिंदू राज्य होते. नंतर मुगल आणि इंग्रज येथे आले, 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि दोन देशांमध्ये विभागला गेला. पाकिस्तानने स्वतःला इस्लामिक देश ठरविले आणि परंतु जो हिंदूराष्ट्र व्हायला हवा  होता तो धर्मनिरपेक्ष देश राहिला. बंगाली हिंदू याच देशाचे नागरिक असून त्यांचे अधिकार नाकारून आम्ही त्यांच्यासोबत अन्याय करत आहोत. आसाम एनआरसी प्रक्रिया दोषपूर्ण असून त्यात अनेक विदेशी भारतीय ठरले आहेत. तर मूळ भारतीय वगळले जाणे दुर्दैवी असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले.