|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डीजी बॉईज, एवायसी, साई एकता क्लब विजयी

डीजी बॉईज, एवायसी, साई एकता क्लब विजयी 

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी :

साईराज स्पोर्ट्स फौंडेशन पुरस्कृत टिळकवाडी येथील व्हॅक्सिनडेपो मैदानावर सुरू असलेल्या पाचव्या साईराज चषक बेळगाव तालुकास्तरिय मर्यादित षटकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत गुरूवारी झालेल्या सामन्यात बेळगाव डी. जी. बॉईज, ए. वायसी अ, साई एकता स्पोर्ट्स अलारवाड यांनी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत विजय मिळविला.

प्रमुख पाहुणे दीपक पाटील, मेहफूज दफेदार, संजय सातेरी यांच्याहस्ते प्रथम शेट्टी, चंदण पालणकर जावेद धामणेकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

संक्षिप्त धावफलक

1) प्लेअर चॉईस : 10 षटकात 8 बाद 69 धावा पराभूत विरूद्ध डीजी बॉईज : 9.1 षटकात 5 बाद 70.

2) एवायसी ए : 10 षटकात 8 बाद 109 धावा विजयी विरूद्ध लिव्हरपूल 10 षटकात 9 बाद 67 धावा.

3) डीजी बॉईज : 10 षटकात सर्वबाद 66 धावा पराभूत विरूद्ध साई एकता स्पोर्ट्स अलारवाड : 8.2 षटकात 5 बाद 71 धावा.

आजचे सामने

सकाळी 9 वा. एस आर एस हिंदुस्थान बेळगाव विरूद्ध एचसीव्ही बेळगाव

सकाळी 11 वा. बेळगाव वॉरियर्स विरूद्ध एवायसीए.

दुपारी 2 वा. बबलू स्लमजर्स कुडची विरूद्ध साईराज ए