|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राज्योत्सव पुरस्कार प्राप्त शिवानंद कौजलगी यांचा सत्कार

राज्योत्सव पुरस्कार प्राप्त शिवानंद कौजलगी यांचा सत्कार 

प्रतिनिधी /बेळगाव :

     कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार प्राप्त व केएलई संस्थेचे अध्यक्ष शिवानंद कौजलगी यांचा केएलई संस्थेच्यावतीने गुरूवारी महाविद्यालयाच्या सभागृहात कौतुक सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रभाकर कोरे होते. व्यासपीठावर अशोक बागेवाडी उपस्थित होते.

    प्रारंभी लिंगराज महाविद्यालयातील विद्यार्थिंनिनी प्रार्थना सादर केली. प्रास्तविक व स्वागत महादेव बळीगार यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. लिंगराज कॉलेजचे निवृत्त प्राचार्य बसवराज जगजंपी यांनी कौजलगी यांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी डॉ. प्रभाकर कोरे, अशोक बागेवाडी, डॉ. बसवराज जगजंपी आदी मान्यवरांच्या हस्ते शिवानंद कौजलगी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. प्रभाकर कोरे यांनी कौजलगी यांच्या कार्याची प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या.

   याप्रसंगी महादेव बळीगार, बसवराज जगजंपी, बसम्मा मेथड, व शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. महेश गुरणगौडर यांनी केले.