|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तालुक्याला पाणी आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : राजश्रीताई नागणे

तालुक्याला पाणी आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : राजश्रीताई नागणे 

प्रतिनिधी /सांगोला :

गेले 28 दिवस सुरू असलेले जनावरांसहित शेतकयांचे ठिय्या आंदोलन हा एक मोठा संघर्ष शेतकयांनी उभा केला. तुमचा हा संघर्ष जनतेने नाही तर परमेश्वराने सुद्धा पाहिला असून हा संघर्ष तालुक्यातील शेतकयांचा पहिला व शेवटचा असून इथून पुढच्या काळात असा संघर्ष करण्याची वेळ शेतकयांवर येणार नाही. कारण येत्या 7 ते 8 दिवसात  तालुक्याला  पाणी मिळाल्याशिवाय  राहणार नाही अशी ग्वाही देऊन तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे अभिवचन संघर्षनेत्या राजश्रीताई नागणे यांनी दिले. त्यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे गेले 28 दिवस सांगोला तहसिल समोर सुरू असलेले जनावरांसहित शेतक-यांचे ठिय्या आंदोलन काल स्थगित करण्यात आले.

काल गुरुवार दिनांक 13 रोजी सांगोला तहसील कार्यालय येथे सायं. 5 वाजता संघर्षनेत्या राजश्रीताई नागणे यांनी भेट देवुन गेले 28 दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलकांना संबोधित केले. यावेळी तहसिलदार संजय पाटील, पोनि राजकुमार केंद्रे, कृती समितीचे दत्ता टापरे, चेतनसिंह केदार, अरविंद केदार, रमेश जाधव, सुनिल गायकवाड, डॉ. विजय बाबर, नंदकुमार शिंदे, अशोक दिघे, पिंटू पाटील, तानाजीकाका पाटील यांच्यासह डॉ. जयंत केदार, शिवाजीअण्णा गायकवाड, दत्ता बाड, युवा शेतकरी विनायक शिंदे यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना राजश्रीताई म्हणाल्या की, दुष्काळी भागातील शेतकयांना पाणी मिळाले पाहिजे हा त्यांचा हक्क आहे. पाण्यामुळे शेतकरी सर्व काही करू शकतो. त्या अनुषंगाने आपल्या तरुण शेतकयांनी हे आंदोलन उभे केले. त्यांचे खरोखरच कौतुक करून यापुढील काळात त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशी ग्वाही दिली. कारण राज्यात सर्वत्र पाणी जाते पण आपल्या तालुक्याला मात्र पाणी देण्यासंबंधी सर्वांची उदासीनता दाखविली जाते. आपणाला पाणी देताना प्रत्येक जण नियम, अटी सांगतो, पण या नियमांना बगल देऊन तालुक्याला पाणी आणता येते व ते आपण करून दाखवणार आहोत. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी टंचाई मधुन शेतीला व जनावरांच्या चायासाठी पाणी देण्यासंबंधी अनुकुलता दर्शिवली आहे.