|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात जलवाहिनीत सापडले दगड

साताऱयात जलवाहिनीत सापडले दगड 

प्रतिनिधी /सातारा :

राजपथावर दोन दिवसांपूर्वी चांगला रस्ता पालिका खोदत असल्याने नागरिक भुवया उंचवत होते, परंतु तब्बल दोन दिवसांच्या शोधानंतर गुरुवारी सकाळी नवरंग दुकानासमोरील जलवाहिनीमध्ये दगड आढळले. हे हटवण्यात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला यश आले. हे काम पाणी पुरवठा विभागाचे सभापती श्रीकांत आंबेकर यांच्या पाठपुराव्याने पाणी पुरवठय़ाचे अभियंता दिग्विजय गावडे यांनी करून घेतले. गेल्या तीन महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्याबाबत नगरसेविका स्मिता घोडके यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या.

सातारा शहरात भवानी पेठेतील नवरंग कापड दुकान ते सदाशिव पेठेचा परिसर आणि शनि मारुती मंदिर परिसरात गेल्या तीन महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्याबाबत नगरसेविका स्मिता घोडके यांनी वारंवार पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपूर्वी पाण्याबाबत तीव्र टंचाई जाणवल्याने पाणी पुरवठा विभागास काम करण्याच्या सूचना पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांनी दिल्या, परंतु नक्की काय दोष आहे हे शोधायचे म्हणजे रस्ता खोदावा लागणार?, जलवाहिनीत कोठे काय दोष आहे हे पहावे लागणार या करता दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सायंकाळी नवरंग कापड दुकानासमोर फूटभर खुदाई केली अन् त्याच वेळी सातारकरांकडून चांगला रस्ता खोदत असल्याच्या भावनाही व्यक्त होत राहिल्या. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने खोदाई करत जलवाहिनीची तपासणी केली असता जलवाहिनीचा जॉइं&ट काढताच त्यामधून तीन दगड आढळून आले अन् सुटकेचा निश्वास टाकला. गुरुवारी सकाळी हे दगड सापडले अन् दुपारी पुन्हा होती तशी जोडाजोडी केली.