|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कवठणी जंगलात शॉर्टसर्किटने आग

कवठणी जंगलात शॉर्टसर्किटने आग 

वार्ताहर / सातार्डा:

कवठणी जंगल परिसरामध्ये शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वणवा लागला. जंगल परिसरामध्ये आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जंगल भागात ग्रामस्थांची काजू, आंबा, फणस आदी झाडांचे लाखोंचे नुकसान झाले. आग विझवण्यासाठी चित्रसेन कवठणकर, स्वप्निल कवठणकर, गोपी कवठणकर, सचिन कवठणकर, सूचन कवठणकर, बाळू कवठणकर, संदीप कवठणकर, नीता कवठणकर, तन्मय कवठणकर आदींनी सहकार्य केले..

Related posts: