|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एडगाव येथे ट्रकला अपघात, चालक जखमी

एडगाव येथे ट्रकला अपघात, चालक जखमी 

वार्ताहर / वैभववाडी:

वैभववाडी एडगावनजीक चाळोबा देवस्थान येथे तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पशुखाद्य भरलेल्या ट्रकला अपघात झाला. यात चालक कृष्णा मोरे (40, रा. सांगली) हा जखमी झाला. त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

ट्रक कोल्हापूरहून सावंतवाडीकडे जात होता. ट्रकच्या धडकेने विजेचे दोन खांब जमीनदोस्त झाले, तर सागाची दोन झाडे तुटली. ग्रामस्थांनी चालकाला ट्रकमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.