|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » leadingnews » दास यांची RBIच्या गव्हर्नलपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरूवात – उद्धव ठाकरे

दास यांची RBIच्या गव्हर्नलपदी नेमणूक ही आर्थिक दहशतवादाची सुरूवात – उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नलपदी शक्तिकांत दास यांची नेमणूक करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. सरकारला सत्य सांगणारे लोक नकोत व होयबा हवेत. शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक त्याच हेतूने झाली असेल तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे, असे मत ठाकरे व्यक्त केले आहे.

तसेच भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामींनी केलेल्या गंभीर आरोपांवरूनही शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केले आहे. डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी शक्तिकांत दास यांच्यावर गंभीर आरोप केले व हे सर्व आरोप कागदावरील आहेत. तरीही दास यांना देशाच्या सर्वोच्च आर्थिक संस्थेच्या शिखरावर बसवले जाते हे धक्कादायक आहे. शक्तिकांत यांची नेमणूक म्हणजे रिझर्व्ह बँकेतील ‘गंमत’ आणि अर्थव्यवस्थेशी ‘खेळ’ व्हायला नको, दास हे राजकारण्यांशी चांगले संबंध ठेवून आहेत. येथे प्रश्न महागाई व अर्थव्यवस्थेचा आहे. राजकारण्यांनी निर्माण केलेली ही भुताटकी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर कशी आटोक्यात आणणार ?, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.