|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कारगिलच्या द्रासमध्ये उणे 19.7 अंश तापमान

कारगिलच्या द्रासमध्ये उणे 19.7 अंश तापमान 

श्रीनगर-जम्मूमध्येही तापमान घसरले :

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी शुक्रवारी यंदाच्या हंगामातील सर्वात थंड रात्र नोंदली गली आहे. हवामान विभागानुसार लडाख आणि कारगिल भागात पारा सातत्याने घसरत चालला आहे. कारगिलच्या द्रास सेक्टरमध्ये शुक्रवारी तापमान उणे 19.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते.

तर श्रीनगर आणि हिवाळी राजधानी जम्मूमध्ये शुक्रवारी यंदाची सर्वात कमी तापमान नोंदले गेले आहे. शुक्रवारी रात्री श्रीनगरमध्ये पारा उणे 4.2 तर जम्मूमध्ये 5.5 अशांपर्यंत घसरले आहे.

महामार्गावर वाहतूक ठप्प

जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रामसूनजीक झालेल्या भूस्खलनामुळे वाहतूक ठप्प झाली. महामार्गावर शेकडो वाहने कित्येक तास अडकून पडली. अधिकाऱयांनुसार बनिहाल-रामबन भागात भूस्खलन झाले. महामार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून वाहतूक ठप्प असून मार्ग मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी देखील जवाहर भुयारानजीन हिमवृष्टीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक दोन दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी सुरू झाली होती.

हिमाचल गारठले

हिमाचल प्रदेशच्या बहुतांश भागात तापमान घसरत चालले आहे. मनालीमध्ये gक्रवारी उणे 5.6 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले. कुफरीमध्ये उणे 1.0 अंश, केलांगमध्ये उणे 12 अंश, काल्पामध्ये उणे 3.0 अंशांपर्यंत पारा घसरला.