|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » यशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली

यशवंत न्युरोसर्जनमधील लिफ्ट कोसळली 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिह्यात एकमेव नामांकित वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक डॉ. अतुल भोसलेसह तिघेजण नातेवाईकांना पाहण्यासाठी यशवंत न्युरोसर्जन हॉस्पिटलला भेट देण्यास गेले होते. नातेवाईकांशी विचारपूस करत ते परत लिफ्टने खाली येत असताना लिफ्टच्या बिघाडाने लिफ्ट मधूनच खाली वेगात आले, त्यामुळे ते थोडक्यात बचावले. या प्रकाराने ते सुरक्षित बाहेर पडले. मात्र, त्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

     याबाबत माहिती अशी की, पंढरपूर देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले हे आपल्या एका नातेवाईकाला आजारी असल्याने सातारा शहरातील नवीन बांधण्यात आलेल्या यशवंत न्युरेसर्जन हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यांनी नातेवाईकांची विचारपूस केली व पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी ते बाहेर पडले. त्यांनी वॉर्ड मधून बाहेर आल्यानंतर लिफ्ट थेट तळ मजल्यावर आढळली. त्यामुळे सर्वत्र धावपळ झाली. तातडीने त्यांना लिफ्टच्या बाहेर सुखरुप काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी व त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी निश्वास सोडला.

    सातारा नगरपरिषद वैद्यकीय क्षेत्रात परवानगी देताना सर्व कागदपत्रांची तपासणी करुन प्रमाणपत्र देते. मात्र, असे असताना सत्ताधारी पक्षाची असलेल्या डॉ. भोसले यांनाच तो अनुभव आल्याने त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. देशभरातील वैद्यकीय शिक्षण देणाऱया कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे संचालकांना असा अनुभव सातारा शहरातील त्या हॉस्पिटलमध्ये अनुभव घेवून याबाबत सर्व लिफ्टची स्ट्रक्चरल ऑडिट करण्याशिवाय पर्याय नाही, असे न सांगता उल्लेख केला.

    आज डॉ. भोसले यांच्यावर हा प्रसंग आला; पण त्या ठिकाणी एखादा रुग्ण असता तर त्याला मृत्यूशी सामना करावा लागला असता, त्याला जबाबदार कोण?, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, याबाबत रुग्ण व त्यांचे नातेवाईकांनी याबाबत यशवंत हॉस्पिटलच्या इतर कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी †िरपब्लिकन ब्ल्यू फोर्सचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ, तालुकाध्यक्ष आनंद तथा बाबा ओव्हाळ यांनी केली आहे.