|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत

उपकेंद सक्षम नसल्यानेच नवे अभ्यासकम नाहीत 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

 मुंबई विद्यापीठाअंतर्गत 800 महाविद्यालयांत 9 लाख विद्यार्थीसंख्या झाली आहे. रत्नागिरी उपकेंद्रांची ताकद वाढवण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सक्षम नसल्याने नवे अभ्यासक्रम सुरू करता येत नाहीत. लवकरच पालघर, वेंगुर्ले येथे नवीन उपकेंद्र सुरू केले जाणार असून तिथे ओशनोग्राफी अभ्यासक्रम सुरू केला जाईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिली.

  रत्नागिरीत आयोजित जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषदेमध्ये डॉ. पेडणेकर बोलत होते. ते म्हणाले की, विद्यापीठातर्फे दरवर्षी 720 परीक्षा घेतल्या जातात. 161 वर्षे इतिहास असलेल्या या विद्यापीठाने 5 भारतरत्न, राष्ट्रपती, पंतप्रधान देशाला दिले. जग झपाटय़ाने बदलत आहे. चौथी औद्योगिक क्रांती होत आहे. 20 वर्षानंतर इंटरनेटवर आधारित 50 टक्के डिजिटल जॉब असतील. ऑफिस ही संकल्पना आता कमी होत जाणार आहे. शाळा महाविद्यालयातही डेटा, थ्री डी प्रिंटिंग रोबोटिक्स, एआय असे अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजे.

  विद्यापीठात एआय मास्टर सायन्स सुरू केले आहे. जर्मनमध्ये कौशल्यावर आधारित 5 मिलियन व चीन 20 मिलियन नोकऱया उपलब्ध आहेत. भारतातही काम वाढेल. आपण कोण आहोत, आपली स्वतःची ओळख झाली पाहिजे व समाज आणि देशासाठी उपयोग शिक्षणाचा उपयोग करता आला पाहिजे. बदलणाऱया जगात नवे ज्ञान शिकेल तोच टिकेल. कलिना कँपस येथे इन्क्युबेटर सेंटर सुरू केले जाणार आहे. मुलांना आधुनिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रोत्साहन द्या, असे कुलगुरु म्हणाले.