|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र

केरी -चोर्ला भागातील म्हादई अभयारण्य क्षेत्रात पाच पट्टेरी वाघाचा अधिवास-राजेंद्र 

वाळपई प्रतिनिधी

 पश्चिम घाटाचा समृद्ध वारसा म्हणून गणल्या जाणाऱया सत्तरी तालुक्मयाच्या महागाई अभयारण्याच्या परिक्षेत्रात सुमारे पाच पट्टेरी वाघांचे अधिवास आजही कायम असून ठिकठिकाणी त्यांचे दर्शन होत आहे. गोवा व कर्नाटक दरम्यानच्या राज्यांना जोडणारा केरी चोर्ला मार्ग हा म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात येत असल्याने या भागांमध्ये आजही सातत्याने पट्टेरी वाघांचे दर्शन होत आहे. यामुळे सदर भागातून वाहतूक करताना प्रवाशानी याची खबरदारी घेणे गरजेचे असून कोणत्याही प्रकारचा आतताईपणा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमी व इतिहास संशोधक राजेंद्र केरकर यांनी केले आहे.तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत राजेंद्र केरकर यांनी सांगितले की प्रसिद्ध झालेल्या वृत्त काही प्रमाणात वादातीत असले तरी याभागामध्ये पट्टेरी वाघांचे वावर दुर्लक्षित करून चालणार नाही. यासंदर्भात अधिक माहिती देताना त्याने सांगितले की म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात झालेल्या सर्वेक्षणानंतर 2016 पर्यंत अभयारण्याच्या परिक्षेत्रात व इतर जंगल परिसरांमध्ये पट्टेरी वाघांचा अधिवास सिद्ध झालेला आहे .यामुळे या भागात पट्टेरी वाघ नाही असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे असले तरी नागरिकांनी याबाबत कोणत्याही प्रकारचा संशय बाळगण्याचे कारण नाही. केरी व चोर्ल महमार्ग हा पूर्णपणे घनदाट जंगलातून जात असून यामुळे खास करून रात्रीच्या वेळी या भागातून वाहतूक करणाऱया खडी ट्रक चालकांना पट्टेरी वाघांचे अनेक वेळा दर्शन घडलेले आहे .

यामुळे त्यांच्या अधिवासाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.  तरुण भारतच्या वृत्तानुसार वाघाचा वावर दोन दिवसापूर्वी दिसला होता सदर भाग हा पूर्णपणे  पणसुली व गुळळे सत्तरी मध्ये येत असून यापूर्वी अनेक वेळा सदर भागांमध्ये पट्टेरी वाघ अनेकांच्या निदर्शनास आलेला आहे. यामुळे प्रसिद्ध झालेले वृत्त खोटे म्हणणे पूर्णपणे चुकीचे म्हणणे धाडसाचे ठरणार असून वापरण्यात आलेला फोटो हा काही प्रमाणात चुकीचा असू शकतो तरीसुद्धा याभागांमध्ये पट्टेरी वाघांचे अस्तित्व हे नजरेआड करता येणार नाही असेही राजेंद्र केरकर यांनी स्पष्ट केले. सध्या गोवा कर्नाटक दरम्यान चोर्लामार्गे वाहतुकीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले असून यारस्त्यावरून प्रवास करताना पूर्णपणे खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदर भाग पूर्णपणे रानटी जनावरांचा अधिवास असलेला असून या भागांमध्ये सातत्याने पट्टेरी वाघ बिबटय़ा गवे रेडे रानडुक्कर साळींदर चितळे अशा प्रकारच्या रानटी जनावरांचा वावर असून यामुळे त्यांच्या जीवावर कोणत्याही प्रकारचा आघात होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक वेळा ही रानटी जनावर रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असून काहीवेळा प्रवासी वर्गाकडून त्यांचे फोटो घेणे किंवा त्यांना

डिवढय़ाचा प्रकार सातत्याने होत असतो. सदर बाब गंभीर स्वरूपाची असून तसे केल्यास प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. यासंदर्भात वन खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की म्हादई अभयारण्याच्या परिक्षेत्रात पाच वाघांचे अस्तित्व असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले आहे. काही वर्षापूर्वी सर्वेक्षणानुसार लावण्यात आलेल्या कॅमेरामध्ये पट्टेरी वाघाचा वावर झाला असून यामुळे या भागांमध्ये पट्टय़ांनी वाघांचा अधिवास सप्रमाण सिद्ध झालेला आहे.  अभयारण्य परिक्षेत्र चा भाग हा पूर्णपणे पश्चिम घाटाच्या परिसरात येत असल्याने याभागातील जैविक संपत्ती ही जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत श्रीमंत असल्याने या भागांमध्ये दुर्मिळ स्वरूपाच्या रानटी जनावरांचा अधिवास अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. यामुळे याजैवविविधतेला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे हे सर्वांचेच कर्तव्य असल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.