|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

धनु राशीत सूर्य प्रवेश, मंगळ, प्लुटो लाभयोग होत आहे. रविवार, सोमवार तुमच्या कामात धावपळ होईल. अडचणी येतील. परंतु मंगळवारपासून राजकीय, सामाजिक कार्यात प्रयत्नाने तुमच्या योजनेला यश मिळेल. लोकांना तुमच्याबद्दल विश्वास वाटेल. धंद्यात जिद्दीने काम करा. फायदा होईल. कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. अभ्यासात आळस करू नका. कोर्टाच्या कामात सहाय्य मिळेल.

वृषभ

धनुराशीत सूर्य प्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. ग्रहांची साथ असली तरी तुमचे प्रयत्न कमी पडू देऊ नका. धंद्यात मोठे काम मिळवा. मंगळवार, बुधवारी अडचणीवर विजय मिळवा. घरात, नोकरीत सर्वत्र तणाव होऊ शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात किरकोळ मतभेद होतील. वरि÷ांची मर्जी पाहून बोला. कला, क्रीडा, शिक्षणात कामचलाऊ धोरण ठेवू नका. कोर्टाच्या कामात नम्रतेने बोला.

मिथुन

सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाची कामे करून घ्या. धनुराशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. सामोपचाराने बरेच प्रश्न सोडवता येतील. धंद्यातील समस्या समजून घेता येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील चुका शोधून त्यात सुधारणा करता येईल. घरातील व्यक्तींना खूष ठेवता येईल. शेअर्सचा अंदाज सावधपणे घ्या. कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात मेहनत घेत रहा. कोर्टाच्या कामात योग्यतेच बोला.

कर्क

कर्क राशीच्या ष÷स्थानात सूर्य प्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. या सप्ताहात तुम्ही ठरविलेले काम करून घ्या. मन स्थिर राहील. धंद्यात मोठे कंत्राट मिळेल प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात अरेरावी  न करता सौम्य भाषेत तुमचा विचार मांडा. वाहन जपून चालवा. कायदा पाळा. कला, क्रीडा, शिक्षणात महत्त्व टिकवून ठेवा. कोर्टाच्या कामात किरकोळ अडचण येईल. संसारात शुभ समाचार मिळेल.

सिंह

सिंह राशीच्या पंचमस्थानात सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. रविवार, सोमवार चिंता वाटेल. प्रकृतीची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात मंगळवारपासून तुमचे कार्य अधिक वेगाने पुढे जाईल. घरातील व्यक्ती आनंदी होतील. अशी बातमी मिळेल.  मुलांची प्रगती होईल. धंद्यातील प्रश्न सोडवता येईल. काम मिळेल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल. कोर्टाच्या कामाला दिशा मिळेल.

कन्या

धनु राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, बुध त्रिकोण योग होत आहे. धंद्यात पैसा व प्रति÷ा मिळेल. प्रयत्न जारी ठेवा. घरासाठी शोध घेण्यात यश मिळेल. नोकरीत, कोर्टकेसमध्ये मंगळवार, बुधवारी वाद होईल. सावधपणे वागा. राजकीय, सामाजिक कार्यात विचारपूर्वक योजना करा. दौऱयात यश मिळेल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल. शेअर्समध्ये निर्णयाची घाई करू नका.

तुळ

तुळेच्या  पराक्रमात सूर्य प्रवेश, चंद्र, बुध प्रतियुती होत आहे. या सप्ताहात कामे वाढतील. धावपळ होईल. मनाविरुद्ध कामे राजकीय, सामाजिक कार्यात करावी लागतील. तरी तुमचे नुकसान होणार नाही. धंद्यात प्रयत्न करा. हिशोब नीट करा. नोकरीत काम करताना सावध रहा. घरात कामाचा व्याप वाढेल. कला, क्रीडा, शिक्षणात हलगर्जीपणा करू नका. मन अस्थिर राहील. कोर्टाच्या कामात विलंब होईल.

वृश्चिक

वृश्चिकेच्या धनस्थानात सूर्य प्रवेश, बुध, गुरु युती होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. कर्माचा फायदा करून घेता येईल. आळस करू नका. मंगळवार, बुधवार प्रवासात सावध रहा. रागावर ताबा ठेवा. यश मिळेल. राजकीय, सामाजिक  कार्यात तत्परता दाखवावी लागेल. जवळचे लोक काडय़ा घालतील. कला, क्रीडा, शिक्षणात नियमितपणा ठेवा. कोर्टकेसमध्ये यश मिळवता येईल.

धनु

तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. सर्वच ठिकाणी येणाऱया अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करता येईल. राजकीय, सामाजिक  कार्यात अभ्यासपूर्वक कामे करा. निर्णय घ्या. धंद्यात अरेरावी करू नका. कामे मिळवा. कला, क्रीडा, शिक्षणात आळस करून चालणार नाही. वाटाघाटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. कोर्टाच्या कामास गती देता येईल.

मकर

मकरेच्या  व्ययस्थानात सूर्य प्रवेश, चंद्र बुध प्रतियुती होत आहे. विरोधाला न जुमानता तुम्ही जिद्दीने कार्य करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्यात सावधपणे  कृती करा. दादागिरीची भाषा वापरू नका. धंद्यात लक्ष द्या. नवे कंत्राट मिळवा. घरातील महत्त्वाची कामे करण्यात वेळ जाईल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रयत्नाने यश मिळेल. बुद्धिचातुर्य वापरा. कोर्टकेसमध्ये किरकोळ तणाव संभवतो.

कुंभ

या सप्ताहात तुमचे महत्त्व राजकीय, सामाजिक कार्यात वाढेल. धनुराशीत येणारा सूर्य तुमची प्रतिमा उजळेल. लोकप्रियता मिळेल. बुध, गुरु युती होत आहे. धंद्यात  मोठा बदल करता येईल. मोठे स्वरुप देता येईल. ग्रह थोडा काळ पोषक  असतात. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. प्रयत्न करा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रगती करता येईल. कला, क्रीडा, शिक्षणात यशस्वी कारकीर्द असेल, कोर्टकेस संपवता येईल.

मीन

धनुराशीत सूर्य प्रवेश, बुध, गुरु युती तुमच्या  प्रत्येक कार्याला सहाय्य करणारी ठरेल. धंद्यात मनाप्रमाणे वाढ करता येईल. जुना धंदा नव्याने मोठा करू शकाल. राजकीय, सामाजिक कार्यात पद मिळेल. मोठा निर्णय घेण्याची वेळ येईल. जवळच्या लोकांना दुखवू नका. घरातील तणाव कमी करता येईल. कला, क्रीडा, शिक्षणात चांगले यशस्वी व्हाल. कोर्टकेस जिंकता येईल.