|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » औद्योगिक वसाहती महत्वाच्या की लाखो नागरिकांचे जीव ?

औद्योगिक वसाहती महत्वाच्या की लाखो नागरिकांचे जीव ? 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर, पुणे, अहमदनगर तसेच उस्मानाबाद या चार जिह्यातील लाखो नागरिकांची तहान उजनीवर अवलंबून आहे. दुसऱया बाजूला अनेक औद्योगीक वसाहतींना पाणी पुरवण्याबरोबरच त्यांच्यामधील सांडपाणीदेखील उजनी धरण आपल्या पोटात घेते. दरम्यान उजनीमधील विषयुक्त बनलेल्या पाण्यावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. चार जिह्यातील लाखो नागरिकांना पुरवण्यात येणारे विषयुक्त पाणी पिण्याचे थांबवायचे म्हटले तर या संबंधीतांची तहान कशी भागवायची?  त्यातच या धरणामध्ये ज्या ज्या औद्योगीक वसाहती तसेच शहरांचे सांडपाणी मिसळू द्यायचे नाही म्हटल्यास संबंधीत ठिकाणचे पाणी कोठे सोडून द्यायचे? सांडपाण्याच्या विल्हेवाटीअभावी औद्योगीक वसाहती तसेच पुण्यासारख्या शहरे बंद ठेवायची का? असे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत.

 विशेषत्वे, सोलापूर विद्यापीठाने संशोधन करून या जलाशयामधील पाणी नागरिकांसाठी विषासमान कसे आहे ?  हे वास्तव समोर आणून नागरिकांमध्ये  एक प्रकारे  जनजागृती केली. नागरिकांमध्ये भिती पसरवण्याचा मुळीच प्रश्न येत  नाही. इतकेच काय तर उजनीच्या विषासमान असलेल्या पाण्यासंबंधी ठोस उपाय योजना सरकार कराव्या लागतील याचे आव्हान सरकारला कसे आहे? याचे खरेखुरे चित्रदेखील समोर आले आहे.

 उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्री  औद्योगीक पर्यायाने शहर आणि दुसऱया बाजूला लाखो निष्पाप जीव वाचणे असा आलेला बाका प्रसंग कसा समर्थपणे हातात हे पाहणे अत्यंत महत्वाचे आहे.

  उजनीच्या दुषीत पाण्यासंबंधी तोडगा काढण्यासाठी मायबाप सरकार पर्यायाने प्रशासनासमोर मोठा पेच पडलेला असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर जिल्हा  दौरा असून  उजनीच्या पाण्यासंदर्भात तोडगा काढावा अशी हार्त हाक सोलापूरसह, अहमदनगर, उस्मानाबाद जिह्यातील नागरिक करीत आहेत.

  सोलापूर जिह्यासह अहमदनगर, उस्मानाबाद तसेच पुण्यातील काही गावातील नागरिक  उजनी धरणातून आपली तान भागवतात. सुमारे 1966 च्या दरम्यान उजनी धरण बांधले गेले. त्यावेळी सोलापूर जिह्याला पाणी पुरवठा व्हायचा. त्यानंतर नगर, उस्मानाबाद यासह कित्येक गावातील नागरिक उजनी धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरू लागले. 2000 पर्यंत उजनी धरणाचे पाणी पिण्यासाठी योग्य होते. मात्र दरम्यान, 2016-17 केंद्रीय भुजल विभागाच्या आकडेवारीनुसार पुणे, पिंपरी, चिंचवडसह जिह्यातील नदी काठाची गावे, उद्योगातून 1239.63 दशलक्ष लिटर सांडपाणी रोज वेगवेगळ्या मार्गानी भीमा नदीत येते. त्यातील फक्त 397.71 दशलक्ष लिटर एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. 541.92 एमएलडी सांडपाणी रोज भीमेत सोडले जाते. पुणे, पिंपरी-चिंचवड  परसिरातून 1 हजार एमएलडी पाणी सांडपाणी निर्माण होते. या सर्व सांडपाण्यामुळे त्यातील रासायनिक घटकांमुळे भीमानदी पर्यायाने उजनी धरण अती प्रदुषित झाली आहे. पुणे, भिगवण, इंदापूर इथल्या औघोगिक वसाहतीतून दुषित पाणी धरणात येऊन मिळते. आजूबाजूच्या शेतीला दिलेली खत, किटनाशक मिश्रित पाणी धरणात येऊन धरणातील दुषित होते. सध्या धरणात शिसे, पारा आणि अत्यंत घातक रासायनिक घटक आढळून आले असून हे पाणी पिण्यायोग्य नसून भविष्यात पॅन्सरचा धोका निर्माण होवू शकतो असा निष्कर्ष विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी काढलेला आहे. त्यामुळे नागरिक हादरून गेले आहे.

 

 उपाय योजनांसंबंधी दहा वर्षापूर्वीच दिला होता अहवाल 

उजनी धरणासंदर्भात मागील दहा वर्षापूर्वीच अहवाल देण्यात आला होता की, उजनी धरणाचे पाणी पिण्यालायक नाही. मात्र प्रशासन आणि शासनाकडे याकडे लक्ष न दिल्यामुळे उजनीचे पाणी आता विष बनले आहे. पुणे, भिंगवण, चिंचवड, चाकण या कारखान्यातील प्रदुषित पाणी उजनी धरणात सोडण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावी असाच सवाल सध्या नाग†िरक करीत आहेत. मात्र कारखान्याचे पाणी कुठे सोडावे असा पेच शासनाला पडला असेल. तसेच लाखो नागरिकांचे जीव वाचवायचा असेल तर शासन व प्रशासनाकडे तोडगा काढणे गरजेचे आहे.

  

               

  उजनीमुळे शेतीदेखील आली धोक्यात

उजनी धरणात विविध कारखान्याचे सांडपाणी मिसळत असल्यामुळे उजनीचे पाणी आता विष बनले असून ते आता पिण्याच्या पाण्याबरोबरच शेती करण्यासाठी अडचणीचे ठरले आहे. कारण यामध्ये घातक रासयानिक घटक आढळून आल्यामुळे शेती ही धोक्यात आली आहे. उजनीचे पाणी शेतीसाठी वापरल्यास त्याचा परिणाम शेताबरोबरच त्याठिकाणी पिकलेल्या पिके ही धोक्यात आली आहे. यामुळे मानवी जीवनाला अपायकारक असल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच या परिसरातील मत्स्य व्यवसायाबरोबरच येथील मासे खाल्ल्याने मानवी आरोग्याला धोका निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.