|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध जिल्हाधिकारी व तहशिलदारांना लेखी तक्रार

‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध जिल्हाधिकारी व तहशिलदारांना लेखी तक्रार 

पुणे / प्रतिनिधी :

पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन घडविणाऱया ‘सनबर्न’ या फेस्टिव्हलला विविध संघटनांतर्फे विरोध होत आहे. त्यातच आता पुण्यातील श्री शिवसाई संस्थेने फेस्टिव्हलला विरोध केला आहे. मौजे-लवळे, बावधन, ता. मुळशी जिल्हा पुणे येथे मे परसेष्ट प्रा. लि. मुंबई आणि ऑक्सफर्ड रिसोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सनबर्न फेस्टिव्हल हा एक गैर सांस्कृतिक तसेच पाश्चात्य पध्दतीने राबविण्यात येणारा कार्यक्रम आहे. यामध्ये संस्कृतीचा ऱहास होत असल्याची टीका संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप पडवळ यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

दरवर्षी या फेस्टिव्हलमुळे पर्यावरणाचा ऱहास होतो. तो या वर्षी देखिल मोठय़ा प्रमाणात केला आहे. कारण हा कार्यक्रम ‘ओपन टू स्काय’ या संरचनेवर आधारित असल्याने यामुळे पर्यावरण, वृक्ष, टेकडय़ा, डोंगर यांचे नुकसान होते. विनापरवाना निसर्गाची हानी होत असल्याची लेखी तक्रार निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱयांना तसेच ध्वनीप्रदुषण व वायू प्रदुषण होत असल्याबाबतची तक्रार तहशिलदार पौंड यांना केली असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.