|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Automobiles » 2018 मध्ये Google वर सर्च केल्या ‘या’ कार

2018 मध्ये Google वर सर्च केल्या ‘या’ कार 

ऑनलाईन टीम / पुणे : 

होंडा अमेज , महिंद्रा मराज्जो, टोयोटा यारिस, हुंडाई सेन्ट्रो, जीप रैगलर या पाच कार 2018 या वषीमध्ये सर्वात जास्त सर्च केल्या आहेत. असे एका अहवालात संगितले आहे. भारतातील ऑटो बाजाराने जगभरात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दरवषी विदेशातील कंपन्या भारतात नवीन कार लाँच करतात. त्याच सोबत भारतातील कंपन्या देखील नवीन वाहने लॉच करतात

 

या पाच कार बद्दल सविस्तर माहिती

1 होंडा अमेज

गूगलद्वारे प्रदर्शित करण्यात आलेल्या यावषी च्या टॉप टेंडीग कारमध्ये होंडा अमेज ही आग्रेसर आहे. भारतीयांना ‘अमेज’चा नवीन अवतार खूप आवडला असून या कारची खास गोष्ट म्हणजे सीवीटी गियरबॉक्स आणि डिजिटल कार ही आहे. भारतीय बाजारात या कारची किंमत 5.81 ते 9.11 लाखामध्ये आहे

2 महिंद्रा मराज्जो

ही कार गुगल टेंडमध्ये दुसऱया नंबरवर आहे. डबल विशबोन सेटअप आणि आरामदायी केबिनमुळे इनोवा आणि टोयोटाला या कारने मागे टाकले आहे. या गाडीची किंमत 9.99 पासून 13.90 लाखांमध्ये आहे

3 टोयोटा यारिस

ही कार भारतात 2018 मध्ये लाँच झाली या मध्ये सहा एअरबॅग, पार्किंग सेन्सर हे ग्राहकांना फार आवडलेली आहे. या कारची किंमत 9.29 लाख पासून 14.07 लाख रूपयांच्या आत आहे

 

4 हुंडाई सेन्ट्रो

जुन्या हुंडाई सेन्ट्रो प्रमाणे या कारला जास्त पसंती मिळाली नाही .परंतु जुन्या मॉडेलमुळे हुंडाई सेन्ट्रो जास्त सर्च केले गेले आहे. याची किंमत 3.90 पासून 5.65 लाखाच्या मध्ये आहे

 

5 जीप रैगलर

पेट्रोल इंजिनवाली जीप रैगलर या वषी लाँच केली गेली आहे. याची किंमत 56 लाख पासून सुरू होते. भारतात देखील या कारला खूप पसंती मिळाली आहे.