|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणीत उरुसानिमित्त खारीक, उदीचा कार्यक्रम

निपाणीत उरुसानिमित्त खारीक, उदीचा कार्यक्रम 

प्रतिनिधी /निपाणी :

निपाणीत शिळय़ा उरुसानिमित्त चव्हाणवाडा येथे खारीक व उदीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. चव्हाण वारसदार पृथ्वीराज हरिभाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

तत्पूर्वी मंगळवारी व बुधवारी चव्हाणवाडा जिजामाता चौक येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. ही आतषबाजी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच बुधवारी इरशाद नाझा कवाल पार्टी व इस्माईल आझाद कवाल पार्टी-हुपरी यांचाही कार्यक्रम पार पडला.

शुक्रवारी मानाच्या फकिरांची रवानगी व भंडारखाना कार्यक्रम चव्हाणवाडा येथे होणार आहे. तसेच रविवारी पाकाळणी कार्यक्रम चव्हाण वारसदार व मानकरी लवा जम्यासह दर्गा देवस्थान व संत बाबा महाराज चव्हाण समाधीस अभिषेक व गोडा नैवेद्य, मानकऱयांची रवानगी व उरुस समाप्ती होईल, अशी माहिती संयोजकांनी दिली आहे.