|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » भीमा कोरेगावप्रकरणी तेलतुंबडे यांना धक्का , उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

भीमा कोरेगावप्रकरणी तेलतुंबडे यांना धक्का , उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी आनंद तेलतुंबडे यांना मुंबईउच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. तेलतुंबडे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली असून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांना तीन आठवडय़ांची मुदत देण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती. मात्र ’मी कोणत्याही बेकायदा कार्यवाहीत सहभागी झालेलो नाही आणि कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा काहीही संबंध नाही’, असा दावा करत आनंद तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्यांच्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.

 

मुंबई उच्च न्यायालयात आनंद तेलतुंबडे यांच्या याचिकेवर शुक्रवारी (21 डिसेंबर) सुनावणी झाली. न्यायालयाने तेलतुंबडे यांची याचिका फेटाळून लावली असून त्यांना सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यात दाद मागण्याची मुदत देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली प्रा. वरवरा राव, सुध भारद्वाज, अरुण परेरा, वर्नन गोन्साल्वसि आणि गौतम नवलखा यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती.