|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Automobiles » बजाज ऍटोची नवीन प्लॅटीना 110 बाजारात

बजाज ऍटोची नवीन प्लॅटीना 110 बाजारात 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

भारतातील लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या बजाजने. नवीन प्लॅटीना 110 बाजरात लाँच करण्यात आली. नवीन प्लॅटीना 110 आता ग्रे डीकल्ससोबत इबॉनी ब्लॅक, ब्ल्यू डीकल्स समवेत इबॉनी ब्लॅक आणि कॉकटेल वाईन रेडमध्ये उपलब्ध आहे. या बाईकची किंमत 49197/- (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी आहे. तसेच सर्वोत्तम आराम आणि कामगिरी सोबतच या स्टाईलिश बाईकमध्ये अतिरिक्त सुरक्षाही समाविष्ट आहे.

 

नवीन प्लॅटीना 110 ही याप्रकारच्या श्रेणीमधील पहिली अशी बाईक आहे, ज्यामध्ये स्टँडर्ड अँटी-स्किड ब्रेक्स बसविण्यात आले आहेत. अँटी-स्किड ब्रेकिंग दोन्ही चाकांवर अधिक चांगला ब्रेक फोर्स देत असल्याने सर्वप्रकारच्या सफरींमध्ये आणि वेगात प्रवास अधिक सुरक्षित होतो.

 

प्लॅटीना 100 ईएसला यापूर्वीच या श्रेणीतील सर्वात आरामदायक प्रकारात येणारी बाईक म्हणून गौरविण्यात आले आहे, ज्यामध्ये 20… नी कमी झटके बसतात. नवीन प्लॅटीना 110 अधिक आरामदायक आहेः ज्यामध्ये सर्वप्रकारच्या रस्त्यांसाठी फर्स्ट-इन-क्लास स्प्रींग-ऑन-स्प्रींग सस्पेन्शन सोबत नायट्रॉक्स गॅस चार्जड शॉक ऍबसॉर्व्ह आहेत. ज्यामुळे रायडर आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायक बनतो. याची सीट लांबलचक असून चांगल्या प्रतीच्या अपहॉल्स्ट्री आणि सर्वोत्तम दर्जाच्या फोमने तयार केल्याने ते वायब्रेशनला चांगल्या पद्धतीने शोषून घेते.

याबाबत अधिक माहिती देतानाया नवीन प्रकारच्या सादरीकरणावर बोलताना मोटरसायकल बिझनेसचे अध्यक्ष  एरिक वास म्हणाले की, “अद्वितीय सर्वोच्च मायलेज आणि उत्तम आरामाचे दुसरे नाव म्हणजे बजाज प्लॅटीना. सध्याच्या यशस्वी प्लॅटीना 100 ईएस’ला प्लॅटीना 110 ची जोड मिळाली असून 100 सीसी च्या ग्राहकांना एक प्रीमियम ऑप्शन उपलब्ध झाला आहे.. ज्यांना प्रवास आरामदायक आणि सुरक्षित बनवायचा आहे, त्यांच्याकरिता नवीन प्लॅटीना 110 हे एक सर्वोत्तम उत्पादन आहे.