|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » कर्जमाफी करूनही मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट

कर्जमाफी करूनही मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मध्य प्रदेशमध्ये शेतकऱयांचे कर्ज माफ करत कंग्रेसने दिलासा दिलेला असला तरीही नवे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. शेतीसाठी लागणारे खतच पुरेसे उपलब्ध नसल्याने शेतकऱयांना मोठय़ा सशस्त्र पोलिस बंदोबस्तात खताचा पुरवठा करावा लागत आहे. यामुळे जिल्हाधिकाऱयांनी कमलनाथ यांना धोक्मयाची कल्पना दिली असून लवकरात लवकर युरियाची व्यवस्था न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा इशारा पत्राद्वारे दिला आहे.

मध्य प्रदेशमध्ये खताच्या टंचाईची स्थिती 4 ऑक्टोबरलाच समोर आली होती. मात्र, विधनसभा निवडणुका असल्याने शिवराज सिंह यांच्या सरकारने याकडे कानाडोळा केला होता. होशंगाबादच्या जिल्हाधिकाऱयांनी 4 ऑक्टोबरलाच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सावध केले होते. आतापर्यंत पाच जिल्हाधिकाऱयांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रे लिहीली असून 27 हजार मेट्रीक टन युरियाची मागणी केली आहे. मात्र, केवळ 6 केंद्रांतूनच बंदुकधरी पोलिसांच्या बंदोबस्तात युरियाचे वितरण करण्यात येत आहे.जिल्हाधिकाऱयांनी कमलनाथ यांनाही या परिस्थितीच कल्पना देऊन भारतीय किसान संघ याविरोधत आंदोलन छेडण्याची शक्मयता वर्तविली आहे, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी याबाबत राज्याचे मुख्य कृषी सचिव यांच्याकडे उत्तर मागितले आहे.