|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » टँकर उलटून चालक जागीच ठार

टँकर उलटून चालक जागीच ठार 

प्रतिनिधी/ म्हापसा

हणजूण जांभळीकडे येथे अभय वॉटर सप्लायच्या मालकीचा टँकर उलटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. विठ्ठल वाळीकर (40- हणजूण, मूळ कर्नाटक) असे त्याचे नाव आहे.

सदर टँकरद्वारे हणजूण भागात पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. शनिवारी रात्री 8 च्या सुमारास जांभळीकडे येथे टँकर मागे घेण्याच्या प्रयत्नात असताना तो उलटला. त्यात चालक विठ्ठल हा पॅबिनमध्ये अडकून पडला. ट्रकच्या काचा त्याच्या डोक्याला लागल्याने त्याचा तेथेच मृत्यू झाला.

अग्निशामक दलाच्या जवानांनी पत्रा कापून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे पाय आत अडकल्याने बाहेर काढणे कठीण झाले. अखेर क्रेन आणून ट्रक वर उचलण्यात आला. त्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले. लगेच 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली, तर म्हापसाहून शववाहिका आणून मृतदेह बांबोळी येथे पाठविण्यात आला.

अग्निशामक दलाचे अधिकारी शिवाजी नाईक, परेश मांद्रेकर, प्रकाश घाडी, सनील बाणावलीकर, प्रमोद गवंडी यांनी याकामी मोलाची कामगिरी केली. हणजूणचे पोलीस उपनिरीक्षक विदेश पिळगावकर यांनी पंचनामा केला.