|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » जेडीएस कार्यकर्त्याच्या मारेकऱयांना गोळय़ा घाला : कुमारस्वामी

जेडीएस कार्यकर्त्याच्या मारेकऱयांना गोळय़ा घाला : कुमारस्वामी 

ऑनलाईन टीम / बेंगळुरू:

जेडीएस कार्यकर्त्याच्या मारेकऱयांना पकडून गोळय़ा घाल्या असा आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी पोलिसांना दिला होता. संबंधित संभाषणाची ध्वनिफीत व्हायरल झाल्यामुळे कुमारस्वामी वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांच्यावर सर्वच बाजूंनी टीका करण्यात येते आहे.

 

जेडीएस कार्यकर्ता एच प्रकाश याची काही दिवसांपूर्वी मांडय़ा जिल्ह्यातील मड्डूर येथे हत्या करण्यात आली होती. ही हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाली असून त्याचा राजकारणाशी किंवा जेडीएसशी काही संबंध नसल्याची माहिती मिळते आहे. या हत्येनंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी स्थानिक पोलिसांशी दुरध्वनीवरून संवाद साधला होता. या संवादात मारेकऱयांना लवकरात लवकर पकडा आणि गोळय़ा घाला असा आदेश दिला होता. या संवादाची ध्वनिफीत संपूर्ण राज्यभर व्हायरल झाली. यामुळे कुमारस्वामींवर सर्वच स्तरातून प्रचंड टीका करण्यात आली.