|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » कोरेगाव भीमा परिसरावर 11 ड्रोन कॅमेरातून नजर ठेवणार

कोरेगाव भीमा परिसरावर 11 ड्रोन कॅमेरातून नजर ठेवणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुणे जिह्यााातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ परिसरात 1 जानेवारी 2018 ला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर यंदा 1 जानेवारी 2019 रोजी पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासोबतच कोरेगाव भीमा येथील चारही बाजूच्या आठ किलोमीटर परिसरावर 11 ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 ला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर वर्षभर प्रत्येक महिन्यात ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आली. या माध्यमातून त्यांच्यात एक विश्वास निर्माण करण्यात आणि भिती दूर करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत’.

यंदा कोरेगाव भीमा येथे  येणाऱ्या नागरिकांची संख्या  लक्षात घेता त्यादृष्टीने 300 पाण्याचे टँकर, 150 पीएमपीच्या बसेस आणि 11 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असणार आहे. तसेच गेल्या वषीपेक्षा यंदा पोलिसांची संख्या 15 पट असणार आहे. प्रत्येक नागरिकाला सुरक्षा पुरवली जाणार आहे. सोशल मीडिया वर कोणत्याही प्रकारचा मेसेज आल्यास पोलिसांना सांगावे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका. असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केलं आहे.