|Monday, July 22, 2019
You are here: Home » leadingnews » रेल्वेची धडक बसून विवाहितेचा मृत्यू

रेल्वेची धडक बसून विवाहितेचा मृत्यू 

रेल्वेची धडक बसून न्यू बाबले गल्ली, अनगोळ-बेळगांव येथील विवाहितेचा मृत्यू झाला आहे. आज बुधवारी सकाळी साडे सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. उल्मीसलमा अल्लाउद्दीन ढवळेश्वर, वय 33 असे रेल्वेच्या धडकेने ठार झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

उल्मीसलमा नेहमीप्रमाणे सकाळी उल्मीसलमा मॉर्निंगवॉकसाठी गेल्या होत्या. अनगोळमधील चौथे रेल्वे फाटक ओलांडताना कमी ऐकू येणाऱया उल्मीसलमा यांना पटरीवरून धावणाऱया रेल्वे मालगाडीचा आवाज ऐकू आला नाही. यावेळी रेल्वे पटरी ओलांडणाऱया उल्मीसलमाला मालगाडीची जोरदार धडक बसली. या धडकेने उल्मी सलमा यांचा जागीच मृत्यू झाला. उल्मीसलमा यांना कानाने थोडे कमी ऐकू येत होते. उल्मी सलमाच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक बी. टी. वालीकर यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.