|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » खाद्य महोत्सवाने मिठमुंबरीच्या पर्यटनाला चालना मिळेल!

खाद्य महोत्सवाने मिठमुंबरीच्या पर्यटनाला चालना मिळेल! 

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश राणेंचे मत

वार्ताहर / देवगड:

गेली अनेक वर्षे रखडलेल्या मिठमुंबरी-तारामुंबरी पुलाचे काम माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या प्रयत्नामुळे पूर्णत्वास आले. त्यामुळे आज येथील पर्यटनाला चांगली चालना मिळू लागली आहे. मिठमुंबरी ग्रामपंचायतीने खाद्य महोत्सव आयोजित करून येथील पर्यटनाला गती देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रकाश राणे यांनी केले.

मिठमुंबरी ग्रामपंचायत, बचतगट संघ तसेच ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच बीच खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाचा समारोपप्रसंगी सांगता समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानचे जिल्हा सरचिटणीस बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संदीप साटम, डॉ. अमोल तेली, माजी नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर, मुंबई महानगर पालिकेचे चिफ इंजिनियर अरुण लब्दे, सरपंच सौ. रिमा मुंबरकर, उपसरपंच उल्हास गावकर, नरेश डामरी, गणपत गावकर, ग्रा. पं. सदस्य दयाळ गावकर, महेश गावकर, सौ. पल्लवी डामरी, दक्षता मुंबरकर, लक्ष्मी तारी, रसिका गावकर आदी उपस्थित होत्या. श्री. राणे यांनी पर्यटन वाढीसाठी ग्रामपंचायतीने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गावातील लोकांमध्ये पर्यटनाच्या व्यवसायाची जनजागृती होणे आवश्यक आहे. तरच येथील युवकांना रोजगार प्राप्त होईल. मिठमुंबरी पुलामुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली आहे, असे सांगितले. सौ. साळसकर यांनी येथील महिला बचतगटांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून चांगला उपक्रम महिला सरपंच सौ. मुंबरकर व त्यांच्या सहकार्यानी राबविला. महिलांना सक्षम केले तरच त्यांचे घर सक्षम होईल. मिठमुंबरी हा गाव पर्यटनासाठी सुंदर असा असून येथील भव्य सागरी किनारा येणाऱया पर्यटकांसाठी नजरेत भरणारा आहे. आगामी काळात येथील पर्यटन वाढीस आलेले दिसेल, असा आशावाद व्यक्त केला. तालुकाध्यक्ष साटम यांनी सागरी किनाऱयावरील मिठमुंबरी या गावात खाद्य महोत्सव भरवून एका चांगल्या उपक्रमाचा आदर्श ग्रामपंचायतीने दाखवून दिला आहे. महिलांच्या माध्यमातून येथील पर्यटनाला गती देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे, असे कौतुक केले. यावेळी श्री. लब्दे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सरपंच सौ. मुंबरकर व उपसरपंच श्री. गावकर यांनी केले. प्रास्ताविक महेश गावकर यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र मुंबरकर यांनी तर आभार दयाळ गावकर यांनी मानले.

Related posts: