|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » leadingnews » अलारवाड पुलाजवळील शिवारात एकाचा धारदार शस्त्राने खून

अलारवाड पुलाजवळील शिवारात एकाचा धारदार शस्त्राने खून 

राष्टीय महामार्ग क्रमांक 4 वरील अलारवाड ब्रिजजवळील शेतात एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. व्यक्तीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. खून झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.
अलारवाड पूलापासून साधारण एक किलोमिटर अंतरावर शेतात मृतदेह आढळून आला आहे. सदर माहिती मिळताच माळमारूती पोलीस स्थानकाचे उपनिरिक्षक एस. बी. सौदागर व सहकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related posts: