|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » ‘स्वतःला देशाची ‘फर्स्ट फॅमिली’ समजणारे जामिनावर तुरूंगाबाहेर आहेत’

‘स्वतःला देशाची ‘फर्स्ट फॅमिली’ समजणारे जामिनावर तुरूंगाबाहेर आहेत’ 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

2019 च्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी घराण्यावर जोरदार हल्ला चढवून येणाऱया काळातील राजकीय ‘युद्धा’चे संकेत वर्तवले आहे.

‘ज्यांच्या चार पिढय़ांनी देश चालवला आणि जे स्वतःला ‘फर्स्ट फॅमिली’ समजतात ते जामिनावर बाहेर आलेत. त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोप आहे. ही मोठी गोष्ट आहे. जी मंडळी त्यांच्या सेवेत आहेत, ती हे सत्य लपवून वेगळय़ाच गोष्टी पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत’, अशी खरमरीत टीका पंतप्रधान मोदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. 2019 ची निवडणूक ही ‘मोदी विरुद्ध कुणीतरी’ अशी होणार नसून ती ‘जनता विरुद्ध महाआघाडी’ अशी होईल, असे मत मोदींनी मांडले. मोदी हे जनतेच्या प्रेमाचे आणि आशीर्वादांचे प्रकटीकरण असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.