|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अण्णाद्रमकुचे 26 खासदार पाच दिवसांसाठी निलंबित

अण्णाद्रमकुचे 26 खासदार पाच दिवसांसाठी निलंबित 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अण्णाद्रमकुच्या 26 खासदारांना बुधवारी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी पाच दिवसांसाठी निलंबित केले. लोकसभेच्या कामकाजात वारंवार अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोकसभेमध्ये ‘राफेल’च्या मुद्यावर चर्चा सुरू असताना अण्णाद्रमुकच्या खासदारांनी गदारोळ घातला. लोकसभा अध्यक्षांसमोरील मोकळय़ा जागेत येऊन प्रचंड घोषणाबाजीही केली. लोकसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

 पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अण्णाद्रमुकच्या 26 खासदारांना निलंबित केल्याची घोषणा केली. दरम्यान, कर्नाटकमध्ये मेकेदातु धरण योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. तामिळनाडूवर होणाऱया अन्यायाला विरोध करण्याचा आम्हाला अधिकार आहे. सरकारकडून आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यात आलेले नाही. तामिळनाडूमधील विधानसभा निवडणुकाजवळ आल्याने भाजप या मुद्यावर राजकारण करत आहे, असा आरोप अण्णाद्रमुकचे खासदार एम. थंबीदुराई यांनी केला.

खालील आरोप-प्रत्यारोप दोघांचे फोटो घेऊन समोरासमोर  लावणे                                         

                                      आमने-सामने

राहुल गांधी…                                                  

> ऑडियो टेपमधून राफेलमधील गैरव्यवहाराचा पोलखोल

>माजी संरक्षणमंत्री पर्रिकर यांच्या निवासस्थानी

राफेल व्यवहारासंदर्भातील गोपनीय फाईल

>देशाला 126 विमानांची गरज असताना 36 विमान खरेदीची परवानगी कशी ?

>अनिल अंबानी यांच्याच कंपनीशी व्यवहार कसा झाला?

अरुण जेटली…

> काही कुटुंबांना देशाची सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची वाटत नाही.

त्यांना केवळ पैशाचे गणित कळते.

>  बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँड भ्रष्टाचारात काँग्रेसचे हात बरबटलेले

>  राफेल व्यवहारात हस्तक्षेप करणार नसल्याची सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

> तत्काळ विमाने हवी असल्याने रिलायन्स बरोबर करार