|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसने दंगल घडवणाऱयांना मुख्यमंत्री बनवले : मोदींची कमलनाथांवर टीका

काँग्रेसने दंगल घडवणाऱयांना मुख्यमंत्री बनवले : मोदींची कमलनाथांवर टीका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसने दंगलीचा आरोप असलेल्या लोकांना मुख्यमंत्री बनवले आहे. काँग्रेसमध्ये आतापर्यंत फक्त एका कुटुंबाचंच गुणगान झाले आता ते वंदे मातरम् आणि भारत मातेला विरोध करत आहे. असे म्हणत पंतप्रधन नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर नाव न घेता टीका केली.

 

पंजाबमधल्या गुरदापूरमध्ये त्यांनी एका रॅलीला संबोधित केले. त्यावेळी मोदोंनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदींनी 1984च्या शीख दंगलीचा उल्लेख करत सांगितले की, एका कुटुंबाच्या इशाऱयाने ज्या ज्या आरोपोंना सज्जन सांगून फायली बंद करण्यात आल्या, एनडीए सरकारने सत्तेवर आल्यानंतर त्या सर्व फायली बाहेर काढल्या, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आम्ही एसआयटी स्थापन केली असून, त्याचा परिणामही समोर आला आहे.2022मध्ये न्यू इंडियाच्या माध्यमातून सव्वा कोटी देशवासीयांचे संकल्प पूर्ण करण्यासाठी इथूनच प्रेरणा मिळाली आहे. काँग्रेसचा इतिहास शीख भाऊ-बहिणींचा हत्या करणारा असून, त्यांनी देशात दंगली घडवणाऱया आरोपींना मुख्यमंत्रिपदी बसवले. त्यांच्यापासून पंजाबसह देशवासीयांनी सुरक्षित राहण्याची गरज आहे.