|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » एल ऍण्ड टी कंपनीला 1 हजार 60 कोटीची कामे मिळणार

एल ऍण्ड टी कंपनीला 1 हजार 60 कोटीची कामे मिळणार 

नवी दिल्ली :  

लार्सन ऍण्ड टुब्रो(एल ऍण्ड टी )कंपनीला देशांतर्गत बाजारात 1 हजार 60 कोटी रुपयांची कामे मिळणार आहेत. ही कामे मिळल्याची माहिती मुंबई शेअर बाजारात गुरुवारी कंपनीकडून देण्यात आली आहे. कंपनीला सदरची काम द स्मार्ट कम्युनिकेशन बिझनेस यांच्याकडून ही कामे मिळाली आहेत. आंध्र प्रदेश येथील स्टेट फायबरनेट लिमिटेड(एपीएसफएल) आणि भारतनेट फेज दोन या काम येणाऱया काळात करण्यात येणार आहेत. त्यात आंध्रातील 13 जिल्हय़ातील बांधकाम करण्यात येणार आहेत.

सध्या मिळालेल्या कामात डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा देण्यासाठी योजनेअंतर्गत राबिण्यात येणार आहेत. त्यामुळे इंटरनेटचा महानगरपालिका व अन्य कार्यालयातील नेटवर्कची उभारणी करण्यासाठी कंपनी काम करणार असल्याचे म्हटले आहे. 

या अगोदर कंपनीला पिंपरी चिंचवाड या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या कामाची ठकेदारी मिळाली आहे.त्यात वायफाय, स्मार्ट शहरात संदर्भात उभारण्यात येणाऱया योजनेत सहभाग असल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले आहे.

कंपनीच्या व्यापारात 1,427.25 इतकी वाढ झाली असून या उलाढालीमुळे भारतीय शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांवर बंद झालेत.