|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मोठा स्टार नाही : अमिर खान

महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा मोठा स्टार नाही : अमिर खान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबई आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नाही, असे वक्तव्य मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी कले आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारले असता महाराष्ट्रात सगळय़ांना बाळासाहेबांचा चित्रपट पाहायचा आहे. त्यामुळे कोणताही निर्माता स्पर्धा करणार नाही, अशी प्रतिक्रिया आमिरने दिली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभाग आणि डॉ. संजय बोरूडे यांच्यावतीने लठ्ठपणावरील चाईल्ड ऑबेसेटी या संकेतस्थळाचे गुरूवारी मंत्रालयात आमिर खान यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. मी माझा सर्वाधिक वेळ पाणी फाऊंडेशनसाठी देत आहे. त्यानंतर उर्वरीत वेळात चित्रपटाचे काम करतो आहे. वॉटर संस्थेकडून तांत्रिक सहाय्य घेऊन जलसंधरणाची कामे यशस्वी केली. वातावरण बदलाचे मोठे संकट असून वनसंपदा वाढीवर भर द्यावाच लागेल असेही आमिर म्हणाला.