|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » लिव्हरपूलची घोडदौड मँचेस्टर सिटीने रोखली

लिव्हरपूलची घोडदौड मँचेस्टर सिटीने रोखली 

वृत्तसंस्था / लंडन

इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत अलिकडे क्रिस्टल पॅलेस आणि लिसेस्टर सिटी संघांकडून सलग पराभव पत्कराव्या लागणाऱया मँचेस्टर सिटी संघाने मात्र गुरूवारी झालेल्या सामन्यात लिव्हरपूलची घोडदौड रोखली. या सामन्यात मँचेस्टर सिटीने लिव्हरपूलचा 2-1 असा पराभव केला.

या स्पर्धेच्या गुणतक्त्यात लिव्हरपूलचा संघ आघाडीवर असून त्यांना 1990 नंतर पहिल्यांदा जेतेपद मिळविण्याची संधी मिळाली आहे मँचेस्टर सिटी विरूद्धच्या सामन्यात लिव्हरपूल संघाने गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालविल्या. खेळाच्या पूर्वार्धात सर्जीओ ऍग्युरोने मँचेस्टर सिटीचे खाते उघडले. त्यानंतर रॉबर्टो फिर्मेनोने लिव्हरपूलला बरोबरी साधून दिली. सामना संपण्यास 18 मिनिटे बाकी असताना लेरॉय सॅनेने मँचेस्टर सिटीचा दुसरा आणि निर्णायक गोल केला.