|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » बेस्टचे कर्मचारी संपावर ; मुंबईकरांचे हाल

बेस्टचे कर्मचारी संपावर ; मुंबईकरांचे हाल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बेस्ट कर्मचाऱयांच्या विविध मागण्यांवर सुरू असलेली चर्चा निष्फळ ठरल्याने जवळपास 30 हजार कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. मुंबईत सकाळपासून एकही बस डेपोतून बाहेर पडलेली नसून सातच्या डय़ुटीवर केवळ 1 कंडक्टर आणि चालकांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे. बेस्टच्या संपामुळे कामावर जाणाऱया मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. बेस्ट प्रशासनाकडून याआधीच संपात सहभागी झालेल्यांविरोधात ’मेस्मा’ लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संपकरी कर्मचाऱयांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संपाचा फटका मुंबईतील जवळपास 25 लाख प्रवाशांना बसणार असल्याने संपात सहभागी होणाऱया कर्मचऱयांवर मेस्माअंतर्गत कारवाईचा इशारा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिला आहे. आश्वासनावरच बोळवण गेले अडीच वर्षे कामगारांच्या मागणीपत्रावर चर्चा सुरू आहे. मात्र, कामगारांमध्ये आता प्रचंड असंतोष पसरला आहे. दरवषी आश्वासनावरच बोळवण होत आहे. त्यामुळे कामगारांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी दिल्याशिवाय संप टळणार नाही, असा इशारा बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिला आहे.