|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » सुप्रिम कोर्टाचा सरकारला धक्का ; आलोक वर्मा पुन्हा सीबीआयच्या संचाकपदी

सुप्रिम कोर्टाचा सरकारला धक्का ; आलोक वर्मा पुन्हा सीबीआयच्या संचाकपदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्रीय अन्वेषण विभागातील वादावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकाला धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सीबीआयचे संचालक आलोक कुमार वर्मा यांना रजेवर पाठवण्याचा आदेश रद्द केला आहे.त्यामुळे आलोक वर्मा पुन्हा सीबीआयच्या संचालकपदी राहणार आहेत.

 

आलोक वर्मा आणि सीबीआयमधील त्यांचे कनि÷ सहकारी असलेले विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वितुष्ट विकोपाला गेले होते. या प्रकरणात केंद्र सरकारने हस्तक्षेप करून वर्मा यांचे सर्व अधिकार काढून घेत त्यांना रजेवर पाठवले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 6 डिसेंबर 2018 रोजी निकाल राखून ठेवला होता. त्यावर आज सुप्रिम कोर्टाने निकाल दिला आहे.