|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » धनगर समाजाच्या आमदारांनी पंकजा मुंडेंना मंत्रालयात अडवले ; ‘त्या’ वचनाचा जाब विचारला

धनगर समाजाच्या आमदारांनी पंकजा मुंडेंना मंत्रालयात अडवले ; ‘त्या’ वचनाचा जाब विचारला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

धनगर समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोवर मंत्रालयाची पायरी चढणार नाही, असे सभेत जाहीर वक्तव्य करणाऱया राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यामुळे पंकजा मुंडे आपल्या भूमिकेवरून पलटल्याची टीका धनगर समाजाच्या आमदारांनी केली आहे.

धनगर समाजाचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रामराव वडकुते यांनी पंकजा मुंडे यांना यावेळी मंत्रालयात प्रवेश करताना अडवले आणि जाब विचारला. ‘तुम्ही धनगर समाजाची फसवणूक करत आहात. आज शब्द बदलून मंत्रालयाची पायरी चढला आहात. पण 2019 नंतर धनगर समाज तुम्हाला मंत्रालयात येण्याची वेळच येऊ देणार नाही’, असे रामराव वडकूते यांनी म्हटले आहे.

पंकजा मुंडे यांनी नांदेडमध्ये धनगर आरक्षण जागर परिषदेत उपस्थिती लावली होती. या सभेत पंकजा मुंडे यांनी भाषणात उपस्थितांना धनगर समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करू शकणार नाही, याचा विश्वास असल्याचे जाहीर वक्तव्य केले होते. पण आज मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित होत्या. पंकजा यांना याबाबत विचारले असता ‘मी मंत्रालयाची पायरी चढणार नाही असे विधान केलेच नव्हते’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Related posts: