|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » अनुपम खेर यांच्यासह 13जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अनुपम खेर यांच्यासह 13जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

ऑनलाईन टीम / मुंबई :

अभिनेते अनुपम खेर यांच्यासह अन्य 13 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बिहारमधील न्यायालयाने दिले आहेत. ‘द ऍक्सडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून काही मोठय़ा लोकांची बदनामी केली जात असल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. आज मंगळवारी मुझफ्फरपूर कोर्टात न्यायाधीशांनी अनुपम खेर यांच्यासह अन्य 13 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

‘द ऍक्सडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधन मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधरित असणार आहे. चित्रपटाचा टेलर रिलीज झाल्यापासून वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने चित्रपटावर आक्षेप घेतला असून यामधून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.