|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग » 11 ते 14 जानेवारीदरम्यान पुण्यात ‘ऑटो एक्स्पो’

11 ते 14 जानेवारीदरम्यान पुण्यात ‘ऑटो एक्स्पो’ 

प्रतिनिधी/ पुणे

‘भविष्यातील सुरक्षित व प्रदूषणमुक्त वाहने’ तसेच ‘स्मार्ट शहरांसाठी पर्यावरण पूरक व बहुग़ुणी इलेक्ट्रॉनिक्स वाहने’ या विषयावर 18 व्या ‘ऑटो एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 11 ते 14 जानेवारी दरम्यान गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट  येथे हे प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनाचे संयोजक पी.एन.आर.राजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राजन म्हणाले, 11 जानेवारीला सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. ऑटोमोटीव्ह / ऑटोमोबाईल उद्योगातील अलीकडच्या काळामध्ये विकसित होत असलेले तंत्रज्ञान, त्या  अनुषंगाने वाहतूक व्यवसायाची वाढत जाणारी व्याप्ती यावर आधारित देश- विदेशातील शंभराहून अधिक उत्पादक त्यांचे स्टॉल्स या प्रदर्शनात मांडणार   आहेत. प्रदर्शनात ऑटोमोटीव्ह आणि ऑटोमोबाईल उद्योगातील विकासात झालेल्या बदलांचा आढावा घेण्यात येणार आहे. या उद्योगासंबंधीच्या दृष्टीकोनाबाबतची चर्चा व मॅकेनिक मेळावा 12 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता होईल. आदर्श स्मार्ट पुणे शहरासाठी पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्था, वायू प्रदूषण, पर्यावरण संवर्धनाची गरज आणि नियंत्रण, पर्यायी उर्जेचा वापर आदी बाबींचा समावेश असलेले चर्चासत्र 13 जानेवारीला सकाळी 11 वाजता होणार आहे. या वेळी अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत.

प्रदर्शनामध्ये इलेक्ट्रॉनिक प्रवासी, मालवाहू तीन व चार चाकी वाहने, बसेस, दोन व तीन चाकी स्वयंचलित वाहने, कंपोनंट्स आणि सुटे भाग, गॅरेज, सर्व्हिस स्टेशनसाठी लागणारी सेवा साधनसामुग्री, ऑईल आणि लुब्रिकंटस, पर्यायी इंधन आणि इंधन व्यवस्थेची मांडणी, सेवा साधनसामुग्री आणि साधने, संशोधन आणि विकास, चाचण्या, मापन व्यवस्था, टायर्स, ऑटो ऍक्सेसरीज, वाहनांची सुरक्षितता आणि मार्गदशक उपकरणे हे मुख्य आकर्षण असणार आहे.

दर वषी प्रमाणेच या वषीही पुणे ऑटोतर्फे महाराष्ट्र एस टी आणि पीएमटीमधील  प्रत्येकी दोन ड्रायव्हर्सचा सुरक्षित व सावध वाहन चालविल्याबद्दल ‘बेस्ट ड्रायव्हर्स ऍवार्ड 2018’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.