|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आकेरी येथील डंपर चालकाची आत्महत्या

आकेरी येथील डंपर चालकाची आत्महत्या 

वार्ताहर / कुडाळ:

 आकेरी-आईरवाडी येथील रहिवासी व डंपर चालक सुहास महादेव गावडे (45) यांनी तेथील गणेशकोंड येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. सुहास गावडे डंपर चालक म्हणून कामाला होते. सोमवारी रात्री त्यांनी घरी जेवण केले. नंतर ते घरातून निघून गेले. मंगळवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास एका गुराख्याला तेथील गणेशकोंड ओहोळानजीक जांभळाच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत त्यांचा मृतदेह निदर्शनास आला. त्याने ग्रामस्थांना याची कल्पना दिली. सुहास यांनी घरामागील काही अंतरावर आत्महत्या केली. त्यांच्या खिशात मोबाईल सापडला. पण तो ‘स्वीच ऑफ’ मिळत होता. हवालदार अरवारी, भगवान चव्हाण व रामदास जाधव यांनी पंचनामा केला. माणगाव प्राथमिक आरोग्य पेंद्रात विच्छेदन करण्यात आले. सुहास यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई व भाऊ असा परिवार आहे.