|Monday, March 25, 2019
You are here: Home » Top News » मोदींच्या भूमिकेसाठी माझ्यापेक्षा उत्तम कोणीच नाही : परेश रावल

मोदींच्या भूमिकेसाठी माझ्यापेक्षा उत्तम कोणीच नाही : परेश रावल 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका कोणीच माझ्यापेक्षा उत्तम पद्धतीने वठवू शकत नाही, असा पुनरुच्चार दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी केला. विवेक ओबेरॉयची भूमिका असलेल्या ‘नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर रावल यांनी हा दावा केला. परेश रावलही नरेंद्र मोदींवर चित्रपटाची निर्मिती करत असून गेल्याच वर्षी त्यांनी याबाबत घोषणा केली होती.

‘आपण दर सोमवारी भात खाणे टाळुया, असे मी नऊ वर्षांचा असताना माझी आई म्हणाली होती. युद्धजन्य परिस्थितीमुळे तत्कालीन पंतप्रधन लाल बहादूर शास्त्री यांनी जनतेला सैन्यासाठी धन्य देण्याचे आवाहन केले होते. एका प्रामाणिक माणसाच्या आवाहनामुळे अनेकांनी ही मागणी उचलून धरली होती. त्याचप्रमाणे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घरगुती गॅसचे अनुदान गरजूंसाठी सोडण्याचे आवाहन केले, तेव्हा जनतेने ही मागणी ऐकली, कारण एका प्रामाणिक व्यक्तीचे हे आवाहन होते’ असे सांगत परेश रावल यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळली.

‘फारसा अनुभव नसतानाही त्यांनी आधी एक राज्य आणि नंतर एका देशाची धुरा कशी सांभाळली, हे आपल्या चित्रपटातून दाखवणार आहे’ असंही परेश रावल यांनी सांगितले. ‘ते’ फक्त पंतप्रधन नाहीत, तर गावोगावी फिरुन समस्यांचा अभ्यास करणारे देशवासी आहेत. यामुळे आम्हाला त्यांच्यावर बायोपिक करावासा वाटला’ असं परेश रावल म्हणाले. ‘मी मोदींना पंतप्रधन कार्यालयात भेटलो होतो. त्यांना भेटून मी अत्यंत प्रभावित झालो. मोदींची राजकीय जाण आणि शेजारी देशांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. अमेरिकन्सही त्यांच्याकडून सल्ला घेतात’ असे रावल यांनी सांगितले.

 

 

 

Related posts: